

पुलगाव : लग्नाचे आमिष देऊन विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना दहेगाव धांदे येथे घडली. आरोपी शुभम वानखेडे याचे पीडितेच्या घरी येणे-जाणे आहे. २४ वर्षीय पीडितेची सासू ही सावंगी येथील रुग्णालयात भरती असल्याने तिचे पती व सासरे त्यांना बघण्यासाठी जात होते. दरम्यान, दोघांमध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध जुळले. शुभमने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडितेच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.