दोन बोगस दवाखाने सील! सात दवाखान्यांची केली तपासणी

आष्टी (शहीद) : सध्या बोगस डॉक्टरांवर कारवाईची धडक मोहीम सुरू असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टरांचे दवाखाने बंद करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी दिल्याने आष्टी तालुक्‍यात मंगळवारी सात दवाखान्यांची तपासणी करून चौकशी करण्यात आली. तसेच दोन डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

साहूल येथील बाळू इंगळे, खडकी येथील आशितोष रॉय, माणिकवाडा येथील मीनल भत्ता, सुरेश पटले, बोरगाव टू येथील राहुल विश्‍वास, तळेगाव येथील हेमंत ठाकरे, केशवर महल्ले यांच्या दवाखान्याची तपासणी केली गेली. यापैकी साहूर येथील बाळू इंगळे, खडकी येथील आशितोष रॉय यांच्यावर कारवाई करून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. स्नेहल कासारे यांनी दिली.

त्यांच्याकडे अधिकृत पदवी न आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवार्ईदरम्यान माणिकवाडा येथील डॉ. मीनल भट्टा व बोरगाव (टुमणी) येथील डॉ. विश्‍वास राहुल यांचे दवाखाने बंद अवस्थेत आढळले. तेथे कुणाचीही उपस्थिती नव्हती. इतर तीन दवाखान्यांमध्ये काहीही दोष आढळून आले नाहीत. ही कारवाई गटविकास अधिकारी मनोहर बारापात्रे, डॉ. स्नेहल कासारे, हेडाऊ आदिंनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here