24 जुन ला डाक अदालतीचे आयोजन! 20 जुन पर्यंत तक्रारी दाखल करण्याचे आवाहन

वर्धा : भारतीय डाक विभागाच्या वतीने अधिक्षक डाकघर येथे दि. 24 जुन रोजी सकाळी 11.30 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना डाक विभागासंबंधी तक्रार असल्यास दि.20 जुन पर्यंत अधिक्षक डाकघर येथे तक्रार दाखल करावी. असे आवाहन अधिक्षक डाकघर यांनी केले आहे. पोष्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे सहा आठवडयाचे आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही अशा तक्रारीची डाक अदालतमध्ये दखल घेतल्या जाणार आहे. यामध्ये विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी आर्डर बाबतच्या तक्रारीचा समावेश असणार आहे. असे अधिक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here