शेतातील तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू! मृतक दोघेही बहीणभऊ

समुद्रपूर : समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरात शेतात खेळत असताना तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना 4 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मृतक दोघेही बहीणभाऊ आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरात शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते.

हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतातील एका घरात राहतात. 3 एप्रिलच्या सायंकाळी शीतल शैलेश कुमरे (5) व शिवम शैलेश कुमरे (3) हे दोघे शेतात असलेल्या तलावावर गेले. वर्धा. समुद्रपूर तालुक्यातील शेडगावजवळील जुनापाणी परिसरात शेतात खेळत असताना अचानक दोघेही तलावात बुडाले.

यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न दिसल्याने दोघांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावात दिसले. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. अचानक दोघेही तलावात बुडाले. घटनेचा तपास पोलीस करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here