कुऱ्हाडीने मारहाण करीत पत्नीवर केला जीवघेणा हल्ला! सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल

वर्धा : घरगुती कारणातून झालेल्या वादात पतीने चक्क पत्नीच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. संगीता रवींद्र रामटेके, असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, रवींद्र रामटेके, असे आरोपीचे नाव आहे. संगीतावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

संगीता आणि रवींद्र हे दोघे घरी असताना त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या रवींद्रने रागाच्या भरात पल्ली संगीताच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. रक्‍ताच्या थारोळ्यात संगीता पडलेली दिसताच रवींद्रने तेथून पळ काढला, याची माहिती मुलगा रजत याला माहिती पडताच त्याने घराकडे धाव घेत जखमी अवस्थेत पडून असलेल्या आईला तो सेवाग्राम येथील रुग्णालयात घेऊन गेला. याप्रकरणी त्यानेच सेवाग्राम पोलिसांत जात वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here