चालकाने केला विश्‍वासघात! १.८२ लाखांच्या सिमेंट बॅग लांबविल्या

वर्धा : ट्रकचालकाने ट्रकमध्ये भरलेल्या ५२० सिमेंटच्या थैल्या परस्पर विकून व्यवस्थापकाचा विश्‍वासघात करून आर्थिक अपहार केल्याची घटना पोहणा येथे घडली. याप्रकरणी वडनेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रदीप प्रल्हाद खोब्रागडे हा जे. एस. ट्रान्सपोर्टमध्ये व्यवस्थापक म्हणून कामावर आहे. तो ट्रान्सपोर्टच्या वाहनांवर देखरेखीचे कामही करतो. ट्रान्सपोर्टमघील एम.एच. ४० एन. ६२०० चा चालक सुनील बरडे (रा. बोडखा, जि. चंद्रपूर) याच्या वाहनात १ लाख ८२ हजार रुपये किमतीच्या ५२० सिमेंटच्या थेल्या भरल्या होत्या. मात्र, आरोपी सुनील बरडे याने विश्‍वासघात करुन सिमेंट थैल्या परस्पररित्या विकून आर्थिक अपहार केल्याचे उघडकीस आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here