
कारंजा (घा) : भरधाव दुचाकी रस्त्यांवरुन घसरुन आदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजता दरम्यान बांगडापूर-वर्धा मार्गावरील गाडेघाटाजवळ झाला.
विवेक कृष्णराव सरोदे (२८) रा. पांजरा (काटे) असे मृत युवकाचे नाव आहे. बांगडापूर शिवारात एक दुचाकीस्वार पडलेला असल्याची माहिती बांगडापुरचे पोलीस पाटील अर्जून धुर्वे यांनी कारंजा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता एम.एच. ४० ई ७१५७ चा चालक विवेक कृष्णराव सरोदे हा मृतावस्थेत दिसून आला. दुचाकी घसरल्याने दुचाकीचा अपघात झाल्याचे निदर्शनास आले असून पोलिसांनी याप्रकरणी नोंद घेतली आहे.


















































