भरधाव ट्रकची सामोरच्या ट्रकला धडक; चालक जागीच ठार! हजारावर कोंबड्यांचा मृत्यू

पवनार : भरधाव वेगाने सोयाबीनचे पोते घेऊन जानारा ट्रक बॉयलर कोंबड्या घेऊन सामोर जाणार्या ट्रकवर आदळला. ही घटना सेलु तालुक्यातील कान्हापुरजवळ बुधवार (ता. १८) सकाळी ५.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ट्रक उलटून त्याचे डाले चेचीसवरुन तुटून खाली कोसळले. या अपघातात ट्रकचालक स्टेअरिंगमध्ये फसल्या गेल्याने चालक जागीच ठार झाला.

एमएच ३७ टी १५२१ क्रमांकाचा ट्रक सोयाबीन भरलेले पोते घेऊन नागपुरकडे जात होता दरम्यान या ट्रकच्या सामोर बॉयलर कोंबड्या घेऊन जाणार्या ट्रक क्रमांक सीजी ०८ ऐएल ५५४४ याने अचाणक ब्रेक मारल्याने त्याच्या मागाहुन येणार्या ट्रकची जोरदार धडक बसली. या धडकेत सोयाबीन घेऊन जाणारा ट्रकचे डाले चेचीसपासून तुटले आणी ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला.

कोंबड्या घेऊन जाणार्या ट्रकचेही मोठे नुकसान होऊन यात असलेल्या अडीच हजार कोंबड्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. पुढील तपास सेलू पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here