युवकाने गळफास घेत केली आत्महत्या

सेलू : घोराड येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रामू वामन पिसे (२६, रा. घोराड) असे मृतकाचे नाव आहे.

रामू पिसे हा घोराड येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील रहिवासी आहे. त्याने रात्रीच्या सुपारास लुकेश तळवेकर यांच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी रामू याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.

शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली असून रामू पिसे याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास सेलूचे ठाणेदार सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here