अनोळखी व्यत्किचा मृतदेह आढळला! सेवाग्राम पोलिस घटनास्थळी दाखल

पवनार : येथील वर्धा-नागपूर मार्गांवर प्रेटोलपंपाच्या बाजूला अंदाजे ३५ वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तिचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवार (ता. २१) सकाळी ९ वाजताच्या सुमारास पवनार येथील पेट्रोल पंपजवळ उघडकीस आली. घटेची माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली.

पवनार येथील प्रेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराजवळ एका नग्न अवस्थेत असलेल्या व्यक्तिचा मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसून आला. ही व्यक्ति मानसीक रुग्न असल्याने तो गेल्या तीन-चार दिवसापासून या परिसरात फिरत असल्याचे नागरीकांनी पोलिसांना सांगीतले. मृतक व्यक्ती हा नग्न अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांना घटनास्थळी येत पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पुढील प्राथमिक तपास सेवाग्राम पोलिस स्टेशनचे दिलीप कडू, मनोज लोहकरे हे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here