भरधाव कंटेनर उलटला! वाहनचालक जखमी; वाहनाचे मोठे नुकसान

पुलगाव : नागपूरकडून पुणेच्या दिशेने जात असलेला एम. एच.१२ एन. डब्ल्यू. ९८२४ क्रमांकाचा कंटेनर पुलगाव येथील कॅम्प मार्गावर येताच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अश्यातच वाहन उलटले.

यात सुदैवाने वाहनचालक पृथ्वीराजसिंह थोडक्यात बचावले असले तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातात वाहनचालका किरकोळ जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here