
वर्धा : पतीसोबत टेरेसवर दिसल्याच्या कारणातून वाद करीत मनात राग धरून बसलेल्या पाच आरोपींनी युवतीच्या घरात प्रवेश करीत तिला विवस्त्र करून विनयभंग करीत मारहाण केली. ही घटना देवळी येथे घडली असून, या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, रेश्मा सुनील पचारे हिने दोन दिवसांपूर्वी पीडित युवतीला तू माझ्या पतीसोबत टेरेसवर दिसली होती, या कारणातून वाद केला होता.
याच घटनेचा राग मनात धरून दत्ता पचारे, मीना पचारे, रेश्मा पचारे, सोनू पचारे, गजानन पचारे यांनी जमाव करून पीडित युवतीच्या घरासमोर जात शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर युवतीच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश करीत तिला मारहाण करीत घराबाहेर फरपटत आणले. तसेच पीडितेला विवस्त करीत तिचा विनयभंग करून अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित युवतीच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


















































