85 हजारांचा मुद्देमाल नष्ट! सेवाग्राम पोलिसांची कारवाई

वर्धा : सेवाग्राम पोलिस ठाण्याच्या हदीत सुरू असलेल्या असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर कारवाई करीत 85 हजारांच्या दारूचट्न शॉप करण्यात आला. ही कारवाई सेवाग्राम पोलिसांनी चिंचाळा शेतशिवारात केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचाळा शेतशिवारात अवैधपणे दारूच्या भट्ट्या सुरू असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी ‘वाॅशआउट’ मोहिम राबवून छापा मारला असता नाल्याच्या शेजारी चार दारूभट्या आढळून आल्या. यात मोठे लोखंडी ड्रममध्ये 200 लीटरप्रमाणे चार डूममध्ये 800 लीटर सडवा, 9 प्लास्टिक ड्रममध्ये प्रति लीटर 100 लीटरप्रमाणे 900 लीटर कच्चा मोहा सडवा, रसायणे असा एकूण 1700 लीटर 85 हजारांचा सडवा नष्ट करण्यात आला. 7 हजारांचा मुहेमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कार्यवाही अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्ष सागर कबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात हरिदास काकड, गजानन कठाने, पवन झाडे, अभय इंगळे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here