“डायल ११२! नऊ मिनिटे नऊ सेकंदात प्राप्त तक्रारींवर कारवाई; तत्काळ मदत: सप्टेंबर महिन्यात एक हजारांवर कॉल्स

वर्धा : आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी भारत सरकारची ‘डायल ११२ ही सेवा देशभर दिली जाते. या सेवेमुळे अडचणीत असलेल्या अनेकांना दररोज मदत होते. त्यामुळे ही सेवा महत्त्वाची मानली जाते. वर्धा पोलिसांद्वारे सप्टेंबर महिन्यात ‘डायल ११२ ‘वर १ हजार ७३ कॉल्स प्राप्त झाले असून, प्राप्त कॉल्समध्ये ९ मिनिटे ९ सेकंदात कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या डायल ११२ कंट्रोल युनिटमध्ये पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीत कर्मचाऱ्यांकडून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे. जिल्ह्यात कुठेही कुठलीही घटना घडल्यास नागरिक थेट ‘डायल ११२’वर कॉले करुन माहिती देतात. कंट्रोल युनिटमधील कर्मचारी तत्काळ संबंधित पोलिस ठाण्यांना माहिती देत घटनास्थळी पाठवून कार्यवाही सुरू करतात. पोलिसांकडून तत्काळ मदत मिळत असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. सप्टेंबर महिन्यात ‘डायल ११२’कडे तब्बल १ हजार ७३ कॉल्स प्राप्त झाले असून, केवळ ९ मिनिटे ९ सेकंदात प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. यामुळे समाजातील गरजूंना या माध्यमातून तत्काळ मदत पोहोचविण्यास निश्‍चितच मदत होत आहे, हे तितकेच खरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here