बाप-लेकास चाकूने मारहाण! आरोपी अटक; स्वागत समारोहात घडली घटना

वडनेर : स्वागत समारोहाच्या कार्यक्रमात झालेल्या वादात बाप लेकास धारदार शस्त्राने मारहाण करीत जखमी केले. ही घटना बोपापूर गावात ११ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. सुधाकर दादाजी चांभारे हे कुटुंबासह स्वागत समारोहाच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान तेथे सौरभ तिमांडे आणि पुष्पा तिमांडे, रा. बोपापूर हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान पुष्याने सुधाकर याच्या पत्नीला तुझी मुलगी पळून गेली, लाज वाटत नाही का, असे म्हटले असता तिने ही बाब सुधाकरला सांगितली. सुधाकरने सौरभ तिमांडे याला विचारणा केली असता सौरभने रागाच्या भरात सुधाकरच्या कुशीत धारदार शस्त्राने मारहाण करीत जखमी केले. तसेच सुधाकरचा मुलगा वाद सोडविण्यास गेला असता त्यालाही मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी वडनेर पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here