कृषी पतसंस्थेच्या नवनियुक्‍त अध्यक्षांच्या घरावर सशस्त्र हल्ला! पोलिसांत गुन्हा दाखल; नालवाडी परिसरातील घटना

वर्धा : कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील पराभव आणि मागील संचालक मंडळाने केलेल्या गैर प्रकाराची पोलखोल केल्याचा राग मनात धरून कृषी पतसंस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षाच्या घरावर काहींनी सशस्त्र हल्ला केला. ही घटना नालवाडी भागातील काचोळे ले- आउट परिसरात घडली असून, या प्रकरणी तक्रारीवरून वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.

गुन्हेगारी मानसिकतेच्या काहींनी हातात शस्त्र घेत कृषी पतसंस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रशांत भोयर यांच्या नालवाडी येथील निवासस्थानी हल्ला चढविला. यात प्रशांत भोयर यांच्यासह त्यांचे कुटुंबीव थोडक्यात बचावले असले तरी या घटनेमुळे परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी येथील कृषी विभाग कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक पार पडली. यात प्रशांत भोयर यांच्या गटाने एक हाती सत्ता मिळविली. त्यानंतर विरोधकांना पराभव जिव्हारी लागला. इतकेच नव्हेतर, भोयर यांनी पूर्वीच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार उघड केल्याचा राग मनात धरत आरोपींनी घरावरच सशस्त्र हल्ला चढविल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी प्रशांत ओयर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ५०४, ५०६, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here