शेतकऱ्याला कर्ज देण्यास टाळाटाळ! जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

विजयगोपाल : येथील इंडियन बँकेने ग्राहकांना व शेतकऱ्यांना वेठीस धरले असून बेरोजगारांना तर सोडास शेतकऱ्यांना कर्ज देणे ही इंडियन बँकेच्या जिवावर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागितला आहे. येथील शेतकरी राहुल अर्जुनराव पेटकर यांच्याकडे 3.२५ एकर सर्वे क्रमांक ५३, ५४ असलेली शेती आहे.

या शेतीवरती कुठल्याही प्रकारचे कर्ज नाही किंवा बोझाही नाही म्हणून इंजियन बँकेकडे कर्जासाठी जून महिन्यात अर्ज केला व कर्ज पास पण केले, पण आज देतो उद्या देतो, असे करत सहा महिने लोटले. त्यानंतर आपल्या वडिलांच्या शेतीवरती कर्ज असल्याने आपणास कर्ज देता येणार नाही, असे बँक व्यवस्थापकाने स्पष्ट सांगितले. शेती करण्याकरिता नातेवाईक व नागरिकांकडून उधार पैसे घेतले ते पैसे कसे परत करावे, असा प्रश्‍न शेतकऱ्याला पडला आहे.

त्यानंतर व्यवस्थापकाला विनवणी केली. त्यावेळेस आपणास कर्ज मिळेल, पण वडिलांच्या कर्ज खात्यात २० हजार रुपये भरा, असे सांगत आहे. अशा वेळेस शेतकरी कोठून पैसे आणून भरणार. त्यामुळे राहुल पेटकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे अशा मॅनेजरवरती कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यंदा जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले.मात्र त्यातून अनेक शेतकरी वंचित राहिले त्यांच्या तक्रारीची दखल प्रशासनाने द्यावी अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here