
समुद्रपूर : शेतीच्या वादात तिघांनी व्यक्तीस मारहाण केली. ही घटना परडा येथे घडली. अरुण महाकाळकर शेतात काम करीत असताना लगतच्या शेतातील खुद्वाळ महाकाळकर, बंडू म्रहाकाळकर, तलमले नामक व्यक्तीने बांधीवर दगडं कुणी टाकले, अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी तसेच काठीने मारहाण करीत जखमी केले. याप्राकरणी समुद्रपूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.