

वर्धा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने होळीला पुजा व श्रध्देखाली होळीची पुजा करून त्यात टाकली जाणारी पुरणपोळी, गाठी व ईतर नैवेद्य कार्यकर्त्यांनी वर्धेतील विविध भागातून रात्री ९ वाजेपर्यंत जमा करून जळून वाया जाणारे गोडधड अन्न तेव्हाच रेल्वे स्टेशन, बस स्टॉप व रस्त्यावर उपाशीपोटी झोपलेल्या गरीब गरजूंना वाटप करून वर्धेकरांना पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी आनंदाने उत्साहात साजरी करण्याचा संदेश दिला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभर पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करून होळी लहान करा पोळी दान करा हा उपक्रम राबवून नुसते प्रबोधन करीत नाही तर त्याला कार्यकर्ते विविध पर्याय समाजाला देवून त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतात महाराष्ट्रभर रूढी परंपरेच्या नावाखाली जळावू लाकडांची, झाडे तोडून परंपरेच्या नावाखाली राखरांगोळी करतात व त्यात पुजेच्या नावाखाली पुरणपोळी, गाठी ईतर अन्न होळीत टाकून समाधान मानतात ज्याचा उपयोग मानव जातीला होत नाही.
उलट विषारी वायू निर्माण होतो असे आज विज्ञान परिक्षणाअंती सांगतो जे सत्य आहे. याला कालोचित पर्याय म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते वर्धेतील विविध भागात होळी जवळ खरड्याचे बाॅक्स हातात धरून उभे राहून लोकांना विनंती करतात आपण मनोभावे पुजा करा फक्त होळीत टाकली जाणारी पुरणपोळी गाठी व ईतर नैवेद्य आंम्हाला द्या ते आंम्ही गरीब गरजूंना वाटप करणार आहो हा होळीत न टाकता पुजा करून आम्हाला दान म्हणून द्या असे आवाहन करण्यात आले होते.
वर्धेत राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीपेठ, तडस लेआऊट, अंजनामाता परिसर, स्वागत काॅलनी, गोपुरी, सावंगी मेघे, रामनगर या ठिकाणी अनिल मुरडिव, प्रल्हाद ढोबळे, अभिषेक मुरडीव, अरुण चवडे, विजय कडू, इंजि. देविदास पावडे, रविन्द्र कडू यांच्या पुढाकाराने स्वरा आत्राम, कोमल चौधरी, रजनी सुरकार, प्रकाश कांबळे, माधुरी झाडे, प्रतिभा ठाकूर शालीनी कोकावार शिला देशमुख, डॉ हरीश पेटकर, श्रीकांत धोटे, मनोज कुबडे, सागर वानखेडे, टिपलेजी बाबाराव किटे, विलास भगत, भरत कोकावार, व्दारकाताई ईमडवार, डॉ मंजुषा देशमुख, संजय आत्राम, रूपेश वैद्य, मनोहर पोटदुखे, राजू माथनकर, खोंडे साहेब, संतोष नवरंगे, रमेश भोयर, चंदू वाघ, श्री. धानकुटे, रविन्द्र किरटकर, गोविंद बोनसरे यांनी विविध भागात होळी जवळ उभे राहून पुरण पोळी गाठी व ईतर नैवेद्य जमा करून रेल्वे स्टेशन बस स्टँड व रस्त्यावर झोपलेल्या गरजूंना वाटप करून वर्धेकरांना पर्यावरणपूरक पद्धतीने होळी व रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला.