
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पदमापूर गेट नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वनाधिकाऱ्यांना शनिवारी झालेल्या एका बैठकीत दिले असून, पद्मापूर गेट आता लवकरच खुले केले जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.