
समुद्रपूर : स्थानिक न्यायालयाच्या समोर राहणारे वृद्ध भाऊराव चिंतामण आगरे (८०) यांनी स्वतःच्या घरच्या विहिरीत रात्रीला उडी घेत आत्महत्या केली.
भाऊराव आगरे हे आपल्या लहान मुलांच्या सुनेजवळ राहत होते. त्यांची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी राहत होती. रात्री २ वाजेच्या सुमारास घरातील सर्वांना दरवाजे बंद करण्यास सांगितले व ते झोपी गेले. त्यानंतर पहाटेच्या वेळी त्यांनी घराच्या अंगणात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
सकाळी सगळे उठल्यानंतर म्हातारे कुठे गेले म्हणून शोधाशोध सुरू झाली. तेव्हा विहिरीत गळ टाकून पाहला असता भाऊराव यांचा मृतदेह गळाला लागला. या घटनेची समुद्रपूर पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात मनोज बुरिले, सागर पाचोडे करीत आहेत.