सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकाल तर दंडात्मक कारवाईला सामोरे जाल! सीसीटीव्हीचा राहणार यापुढे वॉच

आर्वी : शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकण्यात येत असल्याने विद्रुपीकरण होत आहे. कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहे. यावर मात. करण्यासाठी शहरातील मुख्य चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. कचरा टाकल्यास त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाईचा निर्णय न.प, प्रशासनाने घेतला आहे.

आर्वीतील छत्रपती शिवाजीमहाराज चौक, आठवडी बाजार व नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयासमोर कचरा, सडका भाजीपाला आदी इतर मोठ्या प्रमाणात टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आर्वी नगर परिषद प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. पालिकेचे प्रशासक तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरीश धार्मिक यांनी याबाबतचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नसल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here