कुऱ्हाडीने मारहाण करीत वृद्धास केले जखमी! पोलिसात तक्रार दाखल

आर्वी : शेतात जनावरे येत असल्याच्या कारणातून झालेल्या वादात वृद्धाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने मारहाण करीत जखमी केले. ही घटना हनुमान वॉर्ड परिसरात २४ फेब्रुवारी रोजी घडली. देवचंद बळीराम गोमासे यांची जाम शिवारात ५ एकर शेती आहे. शेताला लागूनच भक्तराज बारबैली यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील जनावरे देवचंदच्या शेतात जात असल्याने त्यांनी त्यास हटकले. या कारणातून वाद करीत भक्तराज बारबैले याने कुऱ्हाडीने डोक्यावर मारहाण केली. तसेच गजानन बारबैले, नीलेश बारबैले, छत्रपती बारबैले यांनीदेखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जखमी केले. या प्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here