गिरड येथे वीज पडून २३ बकऱ्या ठार; बकऱ्या चारायला गेलेला युवक थोडक्यात बचावला

वर्धा : बकर्या चारायला नेल्या असता विजांच्या कडकडाटासह पाऊस चालू झाला असता जंगलातील ऐका झाडाखाली बकर्या थांबल्या यावेळी झाडावर विज पडून झाडाखाली थांबलेल्या २३ बकर्या जागीच ठार झाल्याची घटना रविवार (ता. १०) गिरड शिवारात दुपारच्या सुमारास घडली. यात बकर्या चारणारा झाडापासून दुर असल्याने बचावला.

गिरड शिवारात आज दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. गिरड येथील बाबा फरीद दर्गा टेकडीवर मनोज फोफारे स्वतःच्या बकऱ्या चारत असताना पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण बकऱ्या मोठ्या झाडाच्या खाली उभ्या होत्या यावेळी आकाशात जोरदार वीज कडाडली यात झाडावर वीज कोसळल्याने त्याच्याखाली असलेल्या 23 बकऱ्या जागीच ठार झाल्या आहे. यात काही बकऱ्या सैरावैरा पळून गेल्याने बकऱ्या वाचल्या तर बकरी चरण्यासाठी गेलेला मुलगा काही अंतरावर असल्याने थोडक्यात बचावला. यात श्रीराम फोफारे याचे दोन लाखाचे नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here