तब्बल दहा तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह मिळाला! सेवाग्राम पोलिस आणि ग्रामस्थांचे अथक प्रयत्न

पवनार : येथील २५ वर्षीय यूवक अमोल मुंगले याने हालाकीची परिस्थिती आणि आजारपणाला कंटाळून परिसरातील विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपविली होती मात्र त्याचा मृतदेह विहिरीतील खोल पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले नव्हते. त्यामुळे काल रात्रभर अमोलचा मृतदेह विहिरीतच होता.

आज सकाळपासूनच पवनार ग्रामपंचायत, सेवाग्राम पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने अमोल मुंगले याचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. तब्बल दहा तासाच्या प्रयत्नानंतर हा मृतदेह विहिरीतुन बाहेर काढण्यात आला.

मृतदेह मिळताच सेवाग्राम पोलिसांनी तो शवविच्छेदनाकरीता पाठविला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोस्टमार्टम होऊन मृतदेह कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पवनार येथे मृतदेहावर स्थानीक स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here