युवतीची दोन लाखांनी ऑनलाइन फसवणूक! आरोपीविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : बँकेतून ऑनलाइन ट्रांन्झेकशन होत नसल्याची तक्रार बँकेच्या कस्टमर केअरला केली. त्यानंतर आरोपीने सदर युवतीला अँप डाऊनलोड करण्यास सांगून युवतीच्या खात्यातील तब्बल 1 लाख 99 हजार रुपये परस्पर वळते करून ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना 5 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता शहरातील विक्रमशिलानगरात घडली.

विक्रमशिला येथील रहिवासी श्रुती राजू सुटे हीचे आयसीआयसी बँकेच्या वर्धा शाखेत खाते आहे. सदर अकाऊंटवर फिर्यादीचे वेतन होत असते. सदर युवतीच्या बँक खात्यातून ऑनलाइन ट्रांन्झेक्शन होत नसल्याने 24 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता आयसीआयसीच्या कस्टमर केअर क्रमांक 8768858302 वरती काँल करून तक्रार नोंदविली. त्यानंतर सदर आरोपीने युवतीला अंडस नावाचे अँप डाऊनलोड करून अँपचा अँक्सेस आयडी मागितला. तो दिल्यानंतत असेप्ट ऑप्शन सिलेक्ट करायला सांगून त्यापुढे सांगितल्याप्रमाणे प्रोसेस केली.

त्यानंतर युवतीच्या मोबाईलवरती ओटीपी मेसेज आल्यानंतर तोसुद्धा दिला. सदर युवतीला याबाबत शंका आल्याने तिने खात्यातील बँलंन्स चेक केले असता 99 हजार, 50 हजार व दोनवेळा 25 हजार रुपये असे एकूण 1 लाख 99 हजार डेबीट होऊन क्रेडिट कार्ड गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी सदर युवतीने दिलेल्या तक्रारीवरून आयसीआयसी कस्टमर केअरच्या अनोळखी इसमाविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here