

वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याचे शासनाचे धोरण आहे. यासाठीच विविध प्रकारचे ऑनलाइन उपक्रम राबविले जातात. वर्धा जिल्ह्याने यापुढे जात आता विविध प्रकारच्या 16 शासकीय सेवा घरपोच देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. या उपक्रमाचा सेवादुत अपॉइंटमेंट’घेऊन लाभार्थ्यांच्या घरी येऊन घरपोच सेवा देतील. जिल्हा प्रशासनाने यासाठी खास अँपदेखील तयार केले आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम आहे.
प्रकल्पाच्या ‘सेवादूत’ नावाने तयार करण्यात आलेल्या अँपद्वारे लाभार्थ्यांने फक्त नाव, पत्ता, संपर्क क्रमांक ही प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सेवादुत’ अपॉइंटमेंट’ घेऊन लाभार्थ्यांच्या घरी येतील. त्यांना पाहिजे असलेल्या सेवांचे कागदपत्र सेवादुत घरीच स्कॅन करून घेतील. त्यानंतर ऑनलाईन अर्ज दाखळ करून घेतील. लाभार्थ्याचा दाखला किंवा प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर लाभार्थ्याला घरपोच नेऊन देतीळ. ही सर्व सुविधा लाभार्थ्याला घरीच उपलब्ध होणार असल्याने यासाठी घराबाहेर कोणत्याही कार्यालयात जावे लागणार प्रायोगित तत्वावर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली.
हा प्रकल्प जिल्हा प्रशासन व ग्रामस्तरीय सेवा केंद्र संस्थांच्यावतीने राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पनेतून सुरु झालेला हा प्रकल्प पुढे जिल्हाभर रावविला जाणार आहे. सेवादुत उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना www.sewadootwardha.in या संकेतस्थळावर सेवादुताची ‘ अपॉइंटमेंट’ घ्यावी लागेल. लाभार्थ्याने दिलेल्या वेळेनुसार सेवादुत तुमच्या घरी येऊन कागदपत्र स्कॅन करून सेवा उपलब्ध करून देण्याची कारवाई करेल.