

सिंदी रेल्वे : जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनाथांसाठी केलेल्या आपल्या कार्यामुळे सर्वाना परिचीत असणार्या जेष्ट समाजसेविका पद्मश्री कै. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या कार्याची उद्याचे देशाचे भविष्य असणार्या विद्यार्थाना सदैव आठवन असावी आणि त्याचा कार्याचा आदर्श सर्वानी आपल्या जीवनात घ्यावा या उदात्त हेतूने युवा संकल्पना संघटना व आधार संघटना शाखा भोसाच्या वतीने गणराज्य दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २६) दहेगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत माईचे भव्य तैलचित्र भेट म्हणून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार मोहन सुरकार हे होते. तर युवा संकल्पना संघटना संस्थापक दिनेश जाधव, आश्रम शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक अरुण डंभारे, माध्यमिक मुख्याध्यापक सुदाम माहूरे, शिक्षक प्रफुल गंधारे याची प्रमुख उपस्थीती होती. सर्व प्रथम माईच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरन करुन पुजन करण्यात आले. मान्यवरांनी याप्रसंगी माईच्या हिमालयाहुन मोठ्या समाजकार्याचा विद्यार्थ्यांना उजाळा करुन दिला. कार्यक्रमाची प्रस्तावना दिनेश जाधव यांनी केली. संचालन आधार संघटनेचे समुद्रपूर तालुका प्रमुख शुभम झाडे यांनी केले. उपस्थीतांचे आभार दहेगाव गोसावी सर्कल प्रमुख प्रविण भारसाखरे यांनी मानले.
कार्यक्रमाला भोसा ग्रा. सदस्य महेशभाऊ अवचट, तालुका सचिव आंनद मुडे, दहेगाव गोसावी सर्कलचे प्रविण भारसाखरे, कांढळी सर्कलचे प्रमुख विक्रम खोडे, आशिष अँडस्कर, शुभम म्हणतारे, समीर आंबूडरे, पवन निखाडे, अक्षय पानसरे, नितीन दिवरे, व आदिवासी आश्रम शाळेचे सर्व शिक्षक गण तसेच विध्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.