

वर्धा : खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दारूसह 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीस ताब्यात घेतले आहे. हो कारवाई गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या वतीने करण्यात आली.
आरोपी बादल मनोज सहारे (वय 35) रा. नागपूर फैल, पुलगाव याला ताब्यात घेतले. पोलिसांनी खासगी वाहनाने रवाना होऊन अमरावती-वर्धा हायवे रोडवरील आपटी फाटा चौक, पुलगाव येथील रोडवर सापळा रचून छापा मारला. यावेळी आरोपीच्या ताब्यातून 180 एमएलच्या 384 शिश्या किंमत 38 हजार 400 तसेच चारचाकी गाडी 1 लाख 40 हजार असा एकूण 1 लाख 78 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गोकुळसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शैलेश शेळके यांच्या निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे खुशाळपंत राठोड, बाबुलाल पंधरे, महादेव सानप जयदीश जाधव, मुकेश वांदिले यांनी केली.