कापसाअभावी आर्वीतील १३ पैकी ६ जिनिंग बंद तर ७ बंद होण्याच्या मार्गावर! आर्थिक फटका; यावर्षी कापसाची आवक झाली अर्ध्यावर

आर्वी : मागील वर्षी कापसाची आवक आर्वी बाजार समितीत २ लाख ५० हजार क्विंटल होती. मात्र, यावर्षी बोंडअळीच्या फटक्याने ही आवक अर्ध्यावर आली आहे. यंदा आर्वी बाजार समितीत केवळ १ लाख ३५ हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून, २०२२ चा कापूस हंगाम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कापसाअभावी आर्वीतील १३ जिनिंगपैकी ६ जिनिंग बंद झाले असून, सात जिनिंग येत्या काही दिवसांत बंद होणार असल्याची माहिती आहे.

२०२०-२०२१ मध्ये आर्वी तालुक्यात कापसाचे पीक समाधानकारक झाले होते. मात्र, पीक जास्त होऊनही कापसाला अपेक्षित भाव मिळाला नव्हता. मागील वर्षी कापसाची आवक मोठ्या प्रमाणावर असल्याने आर्वीतील जिनिंग-प्रेसिंग मे महिन्यापर्यंत सुरू होत्या. मात्र, यावर्षी एप्रिल महिन्यातच कापसाच्या आवकीअभावी आर्वीतील १३ जिनिंग- प्रेसिंगपैकी ६ जिनिंग्र बंद झाल्या तर उरलेल्या ७ जिनिंगमध्ये कापसाची आवक मंदावल्याचे दिसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here