बोरवेलला पाणी लागताच सप्तश्रुंगी परिसरातील नागरिकांनी केला आनंद साजरा! स्नेहल कलोडे यांचा पाठपुरावा; आमदार आंबटकरानी दिला नीधी

सिंदी रेल्वे : पालिकेचा शहरात होणारा तीन दिवसांनी पाणीपुरवठा आणि त्यातही तांत्रिक कारणाने महीण्यातुन एक-दोनदा आवर्जून खंडीत होणारा पाणीपुरवठा आदी कारणाने अनेक भागात पाणी प्रश्न मोठा गंभीर बनतो. विशेष म्हणजे ज्या भागात पाण्याचे इतर कोणतेही स्त्रोत उपलब्ध नाही अशा भागात ही पाणी समस्या रहीवाश्याची चांगलीच डोकेदुखी ठरते.

अशीच जटील समस्या शहरातील वार्ड क्रमांक १६ मधील सप्तश्रुंगी मंदीर परिसरात अनेक दिवसांपासून निर्माण झाली आहे. येथे अतिरिक्त पाण्याचा स्त्रोतसाठी बोरवेल (हातपंपाची) मागणी होती ती भाजपाचे शहर उपाध्यक्ष स्नेहल कलोडे यांच्या प्रयत्नाने पाठपुराव्याने विधान परिषदेचे आमदार रामदास आंबटकर यांनी निधी उपलब्ध करून देत सोमवारी(ता.२५) बोर करुन पुर्ण झाली १८० फुटावर मुबलक पाणी लागल्याने परिसरातील नागरिकांनी एकच आनंद साजरा केला. शिवाय पाण्याची समस्या निकाली काढण्यात विशेष प्रयत्न करणारे स्नेहल कलोडे आणि आमजनतेच्या सेवेसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणारे आमदार रामदास आंबटकर यांचे सप्तश्रुंगी माता मंदिर परिसरातील नागरिकांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here