माजी आमदाराच्या नेतृत्त्वात नगरपालिकेवर मोर्चा धडकला! लाभार्थ्यांना अनुदानाची रक्‍कम हवी

आर्वी : घरकुलच्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदानाची, रक्‍कम देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आलेल्या मार्चाने आर्वी नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून विविध मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना देण्यात आले.

आर्वी नगरपालिका प्रशासनाकडे घरकुलच्या लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यासाठी निधी असतानाही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभापासून वंचित ठेवले जात आहे. अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्‍कम वळती करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत घरकुल योजनेच्या लाभास पात्र ठरलेल्या प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यात तातडीने अनुदानाची रक्‍कम वळती करण्यात यावी, अश्शी मागणी यावेळी करण्यात आली.

माजी आमदार अमर काळे यांच्या निवासस्थानावरून निघालेल्या मार्चाने आर्वी नगरपालिका गाठल्यावर आंदोलनकर्त्यांच्या निष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी विनायक मगर यांना सादर केले. आंदोलनात पंकज वाघमारे, अंगद गिरधर, अँड. दीपक मोटवानी, नगरसेवक रामू राठी, प्रशांत खरकाटे, बिटू मुल्लाजी, अजरमुल्ला, छोटू शर्मा, विशाल साबळे, जया देवरकर, बंटी सुरवाडे, किसन मिस्कन, मयुर साखरकर, नागोराव लोडे, तंदना भिमके, शिल्पा चव्हाण, किरण मिस्कन, देवू तळेकर, कल्पना खडाते, रितेश राणे, गौरव लांडगे, विलास लांडगे, नीलेश देऊळकर, विक्की लसुते, प्रसाद कुलधरी, मंथन कामडी, प्रफुल चिकाटे आदी सहभागी झाले होते.

लामार्थ्यानी आवश्यक कागदपत्रे सादर करावी

१ कोटी २९ लाख ६० हजारांचा डीपीआर दोनचा पहिला हप्ता २९६ लाभार्थ्यांना दोन दिवसातच ६० हजार रुपयेप्रपाणे वितरित करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे त्वरित सादर करावी, यामध्ये एससीएसटी आवास योजनेचे ८७ लाभार्थी आणि उतर १२९ लाभार्थ्यांचा समावेश असल्याचे आंदोलनकर्त्यांशी चर्चा करताना मुर्याधिकारी विनायक मगर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here