सिंदी (रेल्वे) येथील नगराध्यक्षा व उपाध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार! चंद्रशेखर बेलखोडे यानी दाखल केले जिल्हाधिकार्यांकडे प्रकरण

मोहन सुरकार

सिंदी( रेल्वे) : येथील सन २०१६ मध्ये झालेल्या नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून संगीता शेंडे निवडुन आल्या सोबतच नगर परिषद मध्ये भाजपाची सत्ता बसली उपाध्यक्षा पदाकरिता भाजपच्याच सौ. वंदना डकरे यांची निवड झाली परंतु भाजपा मध्ये आंतरिक सत्तासंघर्ष नेहमीच सुरू असल्याने नगराध्यक्षा ह्याची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे, निवडणुकीत नगराध्यक्षा सौ. संगीता सुनील शेंडे यांनी त्या राहत असलेला घरी शौचालय असून त्याचा वापर करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र न.प. ला सादर न केल्याने तसेच उपाध्यक्षा सौ. वंदना दिलीप डकरे यांच्या पतीने न. प. कडून किरायाने घेतलेल्या शॉपिंग कॉम्प्लेसचा किराया व टॅक्स थकीत ठेवल्याने नगराध्यक्ष व उपाध्यक्षा यांच्या विरुद्ध अपात्रतेचे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे शहरातील चंद्रशेखर बेलखोडे यांनी दाखल केले असून जिल्हाधिकारी यांनी या बाबत सुनावनीचा नोटीस बजावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नगराध्यक्षपदी निवडुन आल्याचा दिनांक पासून १८० दिवसात राहत असलेल्या घरी शौचालय असून त्याचा त्या नियमित वापर करीत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने नगराध्यक्षा संगीता शेंडे यांनी या बाबतचे प्रमाण पत्र सादर न केल्याने त्यांना नगराध्यक्ष पदावरून दूर करण्याकरिता महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४ चे पोट कलम (३)यानव्ये व कलम १६ (१), (एम) नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आले असून तसेच उपाध्यक्षा सौ. वंदना डकरे यांच्या पतिने नगर पालिके कडून किरायाने घेतलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स चे १ एप्रिल २०१० ते दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंतचा १४०६५ रुपये त्यांच्यावर असलेला टॅक्स त्यांनी विहित मुदतीत भरला नसल्याने महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ४४ चे पोट कलम(१) (एच) अनव्ये वंदना डकरे यांचे नगरपालिकेतील सदस्यपद रद्द करण्याकरिता जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. तक्रारकर्त्याचा वतीने अँडव्होकेट परीक्षित पेटकर व नगरपालिकेच्या वतीने अँडव्होकेट प्रदीप देशपांडे हे काम पाहत असून गैरअर्जदार नगराध्यक्षा व उपाध्यक्षा यांच्या वतीने त्या स्वतः मंगळवारी झालेल्या तारखेवर हजर झाल्या होत्या या दोन्ही प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे शहराचे व मोठ्या राजकारण्यांचे लक्ष लागले असून निकाल लागे पर्यंत नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावर अपात्रेची टांगती तलवार राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here