
वर्धा : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मुलाला वडिलांनी धारदार वस्तूने पोटावर वार करून जखमी केले. ही घटना टिळकनगर, पुलगाव येथे घडली. आरोपी सुमित रतन निगम रा. टिळकनगर हे दारू पिनेचे सवईचा आहे. आरोपी हा दारू पिऊन घरी आला मुलाच्या पत्नीला जेवन का बनवले नाही, असे म्हणून वाद करून अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला. त्यानंतर मुलगा रतन हा वाद सोडविण्यासाठी गेला असता वडिलांनी धारदार वस्तूने पोटावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी रतन निगम याच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस करीत आहे.




















































