२.२५ लाखांचा देशी दारूसाठा जप्त! एकास केली अटक; एसडीपीओ पथकाची कारवाई

वडनेर : मयूर धाब्याच्या मागे दारूसाठ्याची साठवणूक करून असल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी छापा मारला. दरम्यान, ४७ खोक्यांत देशी दारूच्या २ हजार २५६ शिशा असा एकूण २ लाख २५ हजार ६०० रुपयांचा देशी दारूसाठा जप्त करून, एका दारू विक्रेत्यास अटक केली. ही कारवाई येरला शिवारात 3 रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास एसडीपीओ पथकातील कर्मचाऱ्यांनी केली. शरद मांगरुटकर असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव असून, संगतसिंग जुनी हा अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या उमेश लडके, अनंत हराळ, विनायक गोडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here