अफगाणिस्तानात तणाव वाढला! बाजारात ड्रायफ्रुट्स महागले; किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ

वर्धा : अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम शहरातील सुकामेव्याच्या बाजारावर झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसह अफगाणिस्तानातून होणारी सुकामेव्याची आवक थांबल्याने बदामाच्या किमतीत मोठी तेजी आली आहे. बदामाचे दर प्रतिकिलो ८०० रुपयांवरुन १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. काजू, अंजीर, जर्दाळू पिस्त्याचेही भाव वाढले असून आणखी वाढण्याची शक्यता सुकामेवा विक्रेत्यांनी व्यक्त केली.

अफगाणिस्तानातील घडामोडींपूर्वी शहरातील बाजारपेठेत बदामाचे भाव प्रतिकलो ८०० रुपये होेते. तर अंजीर ६०० ते ७००, पिस्ता ६५० ते ७००, जर्दाळू ५०० ते ५५० काजू ८०० ते ८५० रुपये प्रतिकिलो होते. मागील काही महिन्यांपासून हे दर स्थिर होते. देशात अफगाणिस्तानसह इतर ठिकाणांहून सुकामेव्याची आवक होते. अफगाणिस्तान आणि अमेरिकेतील घडामोडींमुळे अरब देशातून होणारी सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे बदामाचे दर प्रचंड वधारले आहेत. प्रतिकिलो १२०० ते १४०० रुपयांवर पोहोचले आहेत. किलोमागे ४०० ते ६०० रुपयांची दरवाढ झाली आहे. काजूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अंजीर, खजूर, पेंडखजूर, काळा मनुका, पिस्ता यांच्या किमतीचीही १० टक्क्यांनी वाढल्या.

१५ दिवसांचाच स्टॉक शिल्लक

– अफगाणिस्तानातील घडामोडींचे पडसाद वर्ध्याच्या बाजारपेठेतही उमटले असून आवक थांबली आहे.
– बाजारपेठेतील किराणा व्यावसायिक सुकामेवा विक्रेत्यांकडे १५ दिवस पुरेल इतका साठा आहे.
– आणखी दोन महिन्यापर्यंत सुकामेव्याचे दर वाढलेलेच असतील, अशी शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here