रक्‍कम परत मागितली म्हणून चाकूहल्ला

नागपूर : उधार दिलेले ४० हजार रुपये परत मागणाऱ्यावर आरोपींनी कोयत्याने हल्ला चढवून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेने पाचपावलीच्या लाल दरवाजा परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.

गुलशन कवडूजी बोकडे (वय २६) असे जखमीचे नाव असून तो यशोधरानगरातील धम्मदिपनगरात राहतो. गुलशनने काही दिवसांपूर्वी ऋषभ राधेश्याम पैगवार (वय २४) याला ५०हजार रुपये उधार दिले होते. ते परत करण्यासाठी आरोपी टाळाटाळ करीत होता. त्यामुळे शनिवारी मध्यरात्री गुलशन त्याच्या मित्रासह आरोपी पैगवार याच्या पिवळी मारबत चौकाजवळच्या घरी गेला.

पैसे परत मागताच आरोपी पैगवारने गुलशनला नाही देत, असे म्हणून अश्लील शिवीगाळ केली. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची सुरू असताना आरोपी पैगवारचे दोन भाऊ आले. त्यांनी गुलशनला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तर आरोपी पैगवारने घरातून कोयता आणून गुलशनच्या पोटावर घाव घातला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपीच्या तावडीतून गुलशनला सोडवले. माहिती कळताच पाचपावली पोलीस पोहचले. जखमी गुलशनला मेयोत दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here