माय-लेकाने वडिलांना केली काठीने मारहाण

कारंजा : माय-लेकांनी वडिलांना काठीने मारहाण करीत जखमी केले. उमरी येथे ही घटना घडली. सुरेश भक्ते याने पत्नी सावित्री हिला गहू विकून १५ हजार रुपये अँडव्हान्स आणले, असे म्हटले असता, सावित्री आणि मुलगा अमोल याने शिवीगाळ करीत काठीने डोक्यावर मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी कारंजा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हाणामारीच्या घटनांनी डोकेवर काढले असून याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here