जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेला उद्या होणार शिक्षा जाहीर! अँड उज्वल निकम

वर्धा : वर्ध्यातील हिंगणाघाट येथे दोन वर्षांपूर्वी भरचौकात प्राध्यापिका तरुणीला जाळण्यात आले होते. त्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी आज हिंगणाघाट सत्र न्यायालयानं आरोपी विकेश नगराळेला दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी उद्या निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली.

अंकिता पिसुड्डे असं प्राध्यापिका तरुणीचं नाव होतं. ती 3 फेब्रुवारी २०२० रोजी सकाळीच महाविद्यालयात जाण्यासाठी गाववरून हिंगणघाटला पोहोचली. पण, आरोपी विकेश नगराळे काळ बनून तिची वाट पाहत होता याची तिला माहिती नव्हती. त्यानं भरचौकात पेट्रोल टाकून अंकिताला जाळलं. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ नागपूरला उपचारासाठी हलवण्यात आलं. पण, अवघ्या सात दिवसांत तिची मृत्यूशी झुंज संपली. आरोपी विकेश नगराळे याने एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केलं होतं. एकुलती एक मुलगी गमावल्याने आई-वडिलांना चांगलाच धक्का बसला होता. अजूनही ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here