

वर्धा : ६ महिन्यांत पैसे डबल पैसे करून देतो, म्हणून शहरातील १२ जणांची १५ लाख ४ हजार ४०० रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी ज्योती बळीराम यादव (वय ४०, रा. स्टेशनफैल) यांनी वर्धा शहर पोलिस ठाण्यात तक्रारा दाखल केली. यावरून पोलिसांनी समीरूद्दीन मजरूद्दीन सय्यद (वय 30), जुबेरूदीन मजहरूद्दीन सैय्यद (वय 3५) दोघे रा. महादेवपुरा यांचाविरुद्ध गुन्हा नोंद केला. ज्योती बळीराम यादव व अन्य नागरिकांना आरोपीने १० ऑगस्ट २०२४ मध्ये ६ महिन्यांत डबल करण्याचे अमिष दखवत पैसे घेतले. सहा महिन्यांनंतर आरोपीला पैसे मागितल्या त्यानी टाळाटाळ केली.
यांची झाली फसवणूक
ज्योती बळीराम यादव २ लाख २५ हजार, साबरीन खान सलमान खान ३ लाख ४४ हजार ५०० रुपये, फरिदा खान यांचे २ लाख ४७ हजार, परिवन खान यांचे ३० हजार, रिजवान पठाण यांचे १ लाख ३ हजार, नेहा इग्रान अहमद यांचे ७४ हजार, आशमा यांचे ७४ हजार, सलमा आखबर यांचे १ लाख ४४ हजार ९०० रुपये, दुर्गा उईके यांचे ५७ हजार, इंदिरा उड्के यांचे २५ हजार, फरित डइप्नान यांचे १ लाख ५० हजार व दर्गा परिहार यांचे ३० हजार, असे एकूण १५ लाख ४ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली.