व्यक्तीस सबलीने केली मारहाण! पोलिसात तक्रार दाखल

हिंगणघाट : क्षुल्लक वादातून व्यक्तीस सबलीने मारहाण करीत जखमी केले. मुरपाड गावात ही घटना घडली. प्रमोद काशीनाथ लोखंडे हा मित्रासह बोलत असताना श्यामजी कांबळे हा दारु पिऊन होता. दरम्यान श्याम कांबळे याने क्षुल्लक कारणातून प्रमोद लोखंडे याच्या डोक्यावर सबलीने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here