बीज प्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करावी! कृषी सहायक दीपाली वैद्य

पवनार : मागच्या वर्षी सोयाबीन पिकावर अनेक बुरशीजन्य रोगाने आक्रमण केल्याने उत्पादनात मोठी घट आली. बाजारातून आणलेले बियाणे शेतकरी कुठलीही प्रक्रिया न करता सरळ जमिनीत पेरतो, त्यामुळे जमिनीत असलेली बुरशी सुरवातीलाच पिकावर आक्रमण करते.

पर्यायाने ते झाड कमकुवत होते. बियाण्यावर रायझोबियम, पीयस बी, ट्रायकोडरमा या जिवाणूची प्रक्रिया करून एखादे बुरशीनाशक चोळल्यास त्यावर जमिनीतील विषाणू अपाय करू शकत नाही, असे कृषी पर्यवेक्षक जांबुवंत मडावी यांनी सांगितले.

पवनार येथील श्री गुरुदेव शेतकरी उत्पादक गटाला प्रत्यक्षिकासह बीज प्रक्रिया कृषी सहायक दीपाली वैद्य यांनी करून दाखविली. या प्रसंगी गटाचे संजय आदमाने, घनऱ्याम बोरकर, अंबादास धोपटे, प्रशांत भोयर, सुरेश ईखार, दीपक येलणे, ध्यानेश्वर आंबटकर, वसंत मेहर, संजय काळभांडे, सुनील ईखर, वैभव साखरकर, बंडू घुगरे, राजू देवतळे, नितीन भोयर, आशिष भोयर, भाऊराव उमाटे, गोळू येलने, सुनील निंबाळकर उत्पादक गटाचे सदस्य हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here