बापरे बाप घराच्या बाथरुमात आढळले ९८ साप; ड्रम हटविताच आले बाहेर! सर्पमित्रांनी सोडले जंगलात

मिनाक्षी रामटेके

वर्धा : घरातील दोन ड्रम हटविल्यावर त्याखाली जवळपास ९८ साप आढळून आले. सापांना सर्पमित्राच्या मदतीने जंगलात सोडण्यात आले. शहरातील पांडुरंग वार्ड अगस्थी मार्ग येथील मनोज कुडमेथे यांच्या घरी स्नानगृहाचे बांधकाम सुरू होते. या कामात अडसर येत असलेला ड्रम हटविण्यात आले.

एका ड्रमखाली जवळपास २५ ते ३० साप तर दुसर्‍या ड्रम खालीही साप आढळून आल्याने काम करणारे आणि घर मालकांमध्ये भीती निर्माण झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळून आल्याने गरूडझेप वन्यजीव संरक्षण संस्थेचे प्राणी मित्र गौतम पोहाणे यांना माहिती दिली. सर्प मित्रांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता पाणदिवड जातींचे बिनविषारी साप असल्याचे लक्षात आले.

गरूडझेपचे प्राणीमित्र मनीष ठाकरे, तुषार साबळे, अनिल माहोरे, संतोष पडोळे, संकेत मनोरे, रोशन सुरजुसे, दुर्गेश वानखडे यांनी ९८ सापांना पकडले. वनविभाग कार्यालय आर्वी येथे ९८ सापांची नोंदणी करून त्यांना लहादेवी जलाशय वनपरिक्षेत्रात सोडून जीवनदान देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here