खडकी येथे कुरिअर डिलेव्हरी बॉयला कारने चिरडले

केळझर : नियोजित ठिकाणी कुरिअर पोहोचविल्यानंतर दुचाकीने परत जात असलेल्या कुरिअर डिलेव्हरी बॉयला भरधाव कारने धडक दिली. यात कुरिअर डिलेव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात खडकी येथे सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास झाला. अमर भास्कर लाऊडघरे (२४) रा. दहेगाव (गोसावी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

खडकी (आ.) येथील एका व्यक्‍तीला कुरियर देऊन एम. एच. ४० झेड. ८३२४ क्रमांकाच्या दुचाकीने परतीचा प्रवास करीत होता. दुचाकी खडकी शिवारात येताच एम. पी. २० बी. ए. ८३९७ क्रमांकाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दोन्ही वाहनांचा चुराडा होत अमर लाऊडधघरे याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सिंदी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here