

सिंदी रेल्वे : इ.स. १ आॅगस्ट १९६२ ला स्थापंन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शहरातील सुप्रसिद्ध चंद्रशेखर अँग्रो इंजीनिअरिंगने सोमवारी (ता.१) महामंडळचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करुन आपल्या पितृसंस्थेबदल असा ऋणानुबंध जपुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर “जय जवान जय किसान” नार्यानंतर औधोगिक क्रांतीला सुरवात झाली. औधोगिक विकासाठी आपल्या राज्यात सुध्दा १ आॅगस्ट १९६२ ला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापणा करण्यात आली. या संस्थेच्यावतीने नवीन उद्योग उभारणाऱ्याना शासण स्तरावरुन सर्वतोपर मद्दत केली जावु लागली. परिणामता संपुर्ण महाराष्ट्रात औधोगिक जाळे जोरात विनल्या गेले. याच संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत घेत इ.स.१ जानेवारी १९७८ ला शहरात चंद्रशेखर इंजीनिअरिंगची मुहूर्तमेढ रोवली गेली पुढे हेच जिल्ह्य़ातील प्रसिद्ध असे चंद्रशेखर अँग्रो इंजीनिअरिंग नावाचे वटवृक्ष झाले.
मात्र ज्यांच्या सहकार्याने आपण चालाला लागलो त्या मातृसंस्थेला याही काळात न विसरता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योग भवन नागपूर येथील सेन्ट्रल बँक शाखा प्रबंधक सुरेश मोटवानी हे होते. यावेळी चंद्रशेखर अँग्रोचे संस्थापक मधुकर अवचट, श्रीजी गॅस एजन्सीचे रितेश पालीवाल, सुविधा मेडिकलचे राजेश देवतळे, पत्रकार मोहन सूरकार, प्रशांत कलोडे आदीची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम सुरेशजीनी कार्यक्रमाचे फीत कापुन उद्घाटन केले. यावेळी भगवान विश्वकर्माजीच्या प्रतिमेचे पूजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना अध्यक्षस्थांना वरुन बोलतांना मोटवानी म्हणाले कोणताही उद्योग मोठा करतांना चालकाला मोठे परिश्रम करावे लागतात आणि त्यांच्या कल्पनेला कामगारांची साथ मिळाली तर उद्योग वटवृक्ष बनाला वेळ लागत नाही. मात्र मोठे झालेल्या उद्योगांनी आपल्या मातृसंस्थेबद्दल आजही प्रेम आणि ऋणानुबंध जपने हे चंद्रशेखर अँग्रो इंजीनिअरिंग कडुन शिकण्याजोगे असल्याचे गौरवोद्गार काढले.यावेळी चंद्रशेखर अँग्रो इंजीनिअरिंगच्या सर्व कामगारांना मिठाईचे वाटप करुन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.