दुचाकीस्वार ठार! दुसरा गंभीर; मोबाइलवर बोलणे पडले महागात

वर्धा : मोबाइलवर बोलत असताना आणि खिशात ठेवत असताना अनियंत्रित दुचाकी लोखंडी पट्टीवर आदळली. यात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. तर मागे बसलेला तरुण गंभोर जखमी झाला. हा अपघात जाम ते हिंगणघाट रोडवरील उब्दा येथे घडला. कुणाल शेषराव जिल्हारे, असे मृतकाचे बकाचे नाव आहे.

उब्दा येथील रहिवासी मृतक कुणाल क्र. एमएच 32 एई 1220 जात होता मागे त्याचा मित्र उमाकांत जाधव बसला होता. कुणाल हा चालत्या वाहनात मोबाइलवर बोलत होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुणाल जिल्हारे यांचा मृत्यू झाला तर उमाकांत जाधव हा गंभीर जखमी झाला. समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here