
वर्धा : मै यहां का भाई हू, मेरेसे मुजोरी की तो जेम बजाऊंगा… असे म्हणत दहशत पसरविणाऱ्या कथित भाईला रामनगर पोलिसांनी साईनगर चौक परिसरातून अटक करीत त्याच्याकडून चाकू जप्त केला. कुणाल सुरेश इखार हा हातात धारदार सुरा घेऊन, ये-जा करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी साईनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावरील मुख्य चौकात जाऊन कुणाल याला बेड्या ठोकल्या व त्याच्याजवळून चाकू जप्त करीत गुन्हा दाखल केला.