पवनार येथे लसीकरण केद्र सूरु! लोकप्रतीनिधींनी लावून धरली होती मागणी; वयोवृद्ध ग्रामस्थांना दिलासा

श्रीकांत तोटे

पवनार : लसीकरनाकरीता वयोवृद्ध नागरीकांना वर्धा येथे जाव लागत होत यात वेळ आणि पैसा खर्च होत होता त्यामुळे गावातील नागरीकांना मनस्ताप सहन कराव लागत होता. याचीच दखल घेत येथील लोकप्रतिनीधींनी पवनार येथेच लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी पालकमंत्री सुनिल केदार यांच्याकडे केली होती. लसीचा साठा येताच गावातच लसिकरणाची सुविधा नागरीकांना मिळेल असे आश्वासन पालक मंत्यांनी दिले होते. त्यातुनच आज पवनार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहिमेला सुरवात करण्यात आली.

पवनार येथील ४५ वर्षे वरील नागरिकांना लसीकरण साठी वर्धा येथे जावे लागत होते. ऑन लाईन रजिस्ट्रेशन, लसीचा तुटवडा, जण्या येण्यासाठी वाहनाची अडचण या बाबीमुळे पवनार येथील मोचक्या नागरिकांचे लसीकरण झाले होते. एप्रिल महिन्यात कोरीना रुग्णाची संख्या सुद्धा अडीचशेच्या घरात पोहचली होती. संचारबंदी असून सुद्धा रुग्ण वाढत होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण हा मार्ग होता.

नागरिकांची अडचण लक्ष्यात घेऊन सरपंच शालिनी आदमाने, प स सदस्य प्रमोद लाडे यांनी पालकमंत्री ना सुनील केदार यांना निवेदन दिले होते. त्यांनी निवेदनाची दाखल घेत लस उपलब्ध होताच पवनार येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. नव्याने रुजू झालेले आरोग्य अधीकारी डॉ. अक्षय इंगळे यांनी पाठपुरावा केला त्यामुळे आज वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा इंगळे यांचे उपस्थितीत लसीकरण सुरू झाले या प्रसंगी सरपंच शालिनी आदमाने, उपसरपंच राहुल पाटणकर, आरोग्य सेवक आनंद पिल्लारे, आशिष देशमुख, आरोग्य सेविका संगीता वॉटमोडे, मदतनीस संगीता मुंगले, संगणक चालक दर्शन पाटील हे लसीकरण साठी महत्वाची भूमिका पार पाडत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here