शेतात सोकारीला गेलेला शेतमजूर होता सव्वा महिन्यापासून गायब! शेतातील धुऱ्यावर असलेल्या सायकल वरून गावकर्यांनी घेतला जंगलाकडे शोध; तर मिळाले रक्ताने माखलेले कपडे

सतीश अवचट

आष्टी (शहीद) : तालुक्यातील लहान आर्वी येथील शेतमजूर रामदास नारायण भगत वय (७२ वर्ष) हे गेल्या सव्वा महीण्यांपासुन बेपत्ता होते. त्यामुळे नातेवाईक महिनाभर त्यांचा शोध घेतच होते. आज सकाळी १०.०० वाजता नातेवाईकांनी जंगल लगत शेतशिवारात शोध घेतला असता मौजा सुजातपुर जंगलातील कक्ष क्रमांक 17 व 18 मध्ये त्यांचे रक्ताने माखलेले कपडे, आधार कार्ड दिसुन आली. मात्र त्यांचा म्रुतदेह आढळुन आला नाही. त्यामुळे त्यांची वाघाने शिकार केली असल्याचे प्रत्यक्षदर्शी घटना स्थळावरून दिसुन आले होते.

रामदास नारायण भगत हे गेल्या सव्वा महीण्यांपासुन गायप असल्याने नातेवाईकांनी सर्वीकडे शोध घेतला परंतु कुठेच दिसुन आले नाही. अखेर मृतकाचा मुलगा गजानन रामदास भगत याने आठ दिवसांपुर्वी आष्टी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली होती.

आज सकाळी त्यांचे मुल व नातेवाईक जंगलकाठी असलेल्या शेतात पाहायला गेले असता त्यांची सायकल जंगलालगत असलेल्या शेतातील धुऱ्यावर आढळली त्यावरून गावकर्यांनी जंगलाकडे आपली शोधमोहीम वळविली असता काही अंतरावर रक्ताने माखलेले कपडे, आधार कार्ड, दिसुन आले. त्यांनी लगेच ही बाब स्थानिक पत्रकार सुनिल साबळे यांनी फोन वरून कळवली.

पत्रकार सुनील साबळे यांनी तात्काळ स्थानिक पोलीस पाटील, वनविभाग आष्टी, पोलीस स्टेशन आष्टी यांना कळविले असता पोलीस टीम, वनविभाग टीम , तालुका पत्रकार संघ, व स्थानिक नागरीक यांनी परत शोधमोहीम राबविली असता एक एक अवयव सापडत गेले त्यानंतर पोलीस विभाग व वनविभाग आष्टी यांनी अंतोरा प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद मंडारी यांना बोलावून सर्व सापडले अवयव एकत्र करून जंगलातच शवविच्छेदन केले.

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील,वनपाल बारसे, वनरक्षक स्वाती वानखडे, कोकरे, ठाकरे, गणेशपुरे, केंद्रे, वानखडे, भगत, पोलीस उपनिरीक्षक अमोल ठमके, जमादार विनायक घावाट, विलास राठोड, अमित जुवारे, गजू वडनेरकर, निखिल वाणी, पोलीस पाटील, देवानंद पाटील, मृतकाचे मुले नंदकिशोर भगत, गजानन भगत, महेंद्र जामोदकर, प्रमोद वैराळे यांच्यासह इतर ग्रामस्थ व पत्रकार संघ आष्टी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here