खरांगणा (मोरांगणा) : नजीकच्या कासारखेडा येथील स्व. अण्णाजी मुडे विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीने राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये उत्तीर्ण होवून तब्बल 48 हजार रुपयांची शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.
स्व. अण्णाजी मुडे विद्यालयात कासारखेडा येथील ऋतिका महेंद्र जुन्नाके ही इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होती. या विद्यार्थिनी राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहभाग घेतला होता. त्यात ती आर्थिक दुर्बल घटकांमध्ये तब्बल 48 हजार रुपये शिष्यवृत्तीसाठी मानकरी ठरली. स्व. अण्णाजी मुडे विद्यालयातून ती एकटीच उत्तीर्ण झाल्याने गुणवंत विद्यार्थींचे संस्थेचे अध्यक्ष आमदार दादारावजी केचे, सचिव रवींद्र शिरभाते यांनी यांनी अभिनंदन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुसूदन कळमकर, शिक्षक विजय केचे, सुनील येवले, शिक्षिका कोकिळा कपले यांनी विद्यार्थींनीचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या विद्यार्थींच्या यशामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या यशाचे श्रेय तिने शिक्षक व पालकांना दिले. या शिष्यवृत्तीमुळे तिला पुढील शिक्षणाकरिता मदत होणार आहे.